Tuesday, December 23, 2014

Misunderstanding of Purush sukta

पुरुषसूक्ताबाबत अकारण गैरसमज:डॉ.श्री बालाजी तांबे



"पुरुषसूक्त हे लिंगवाचक नाहीच आणि त्यात चातुर्वण्य व्यवस्थेचे कुठेही समर्थन वगैरे नाही. पुरुषसूक्ताचा अर्थ नीट न जाणल्यामुळे त्याविषयी अकारण गैरसमज निर्माण झाले आहेत. पुरुषसूक्तातील मंत्र हे संगणकातील प्रोग्रॅमसारखे आहेत. शरीरातील सर्व ऊर्जाकेंद्रांना उत्तेजित करण्याची ताकद या मंत्रोच्चारांच्या स्पंदनात असते,'' या शब्दांत पूजेच्या वेळी म्हटल्या जाणाऱ्या पुरुषसूक्ताचे समर्थन ज्येष्ठ आध्यात्मिक गुरू डॉ. श्री बालाजी तांबे यांनी केले.

पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या पूजेच्या वेळी पुरुषसूक्त म्हटले जाऊ नये; अन्यथा आंदोलन करू, असा इशारा काही संघटनांनी दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर "साम मराठी' वाहिनीला मुलाखत देताना डॉ. तांबे यांनी पुरुषसूक्ताचा अर्थ उलगडून दाखविला. ते म्हणाले, ""ईश्‍वराच्या पूजेच्या वेळी पुरुषसूक्‍त म्हणण्याची परंपरा खूप जुनी आहे आणि सर्व ठिकाणी आहे; मग ते शैव असतील किंवा वैष्णव वा स्मार्त. एवढेच नव्हे तर सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेत आजपर्यंत कोणाही संताने त्याला आक्षेप घेतलेला नाही. त्यात ज्ञानेश्‍वर माउली, तुकाराम महाराज आदींचा समावेश आहे.''
"सृष्टिनिर्मितीची संकल्पना असलेल्या पुरुषसूक्तातील पुरुष हा शब्द लिंगवाचक नाही. त्यासाठी नर-नारी हे शब्द आहेत. पूर म्हणजे नगर. येथे विश्‍वालाच पूर म्हटले आहे आणि त्याचा ईश तो पुरुष. त्यामुळे सध्या वापरला जाणारा स्त्री-पुरुष भाव पुरुषसूक्तातून व्यक्त होत नाही. वेदांना ते अभिप्रेतच नाही. ते तुम्ही-आम्ही नंतर ठरवले आहे,'' असे डॉ. तांबे यांनी स्पष्ट केले.
"ऋषिमुनींनी मंत्रांचे नियोजन खूप विचारपूर्वक केले आहे. ते संगणकाच्या "प्रोग्रॅम'प्रमाणे आहेत. त्यातून निर्माण होणारी स्पंदने शरीरासाठी लाभकारक असतात. जग स्पंदनावरच चाललेले आहे, नव्हे का? स्पंदनाचा वापर करून मूतखडेसुद्धा फोडले जातात. म्हणजे ध्वनींमध्ये ताकद असते. श्‍वास व दहा नाड्यांसह संपूर्ण चेतासंस्थेचा वापर करून उच्चारलेल्या मंत्रांमुळे निर्माण होणारी स्पंदने उपयुक्त ठरतात. त्यामुळे पुरुषसूक्ताला विरोध करण्याआधी त्याचा अर्थ जाणून घ्या, त्याचा समाजहितासाठी असलेला उपयोग समजून घ्या,'' अशी सूचना करून, ""हजारो वर्षांपासून उच्चारले जाणारे हे मंत्र बदलायचेच असतील, तर त्याला तितकाच समर्थ पर्याय समोर ठेवला पाहिजे आणि एकत्र बसून चर्चेने पर्यायांबाबत निर्णय घ्यायला हवा,'' असा सल्ला डॉ. तांबे यांनी दिला.
पुरुषसूक्तात जातिव्यवस्थेचे समर्थन असल्याचा युक्तिवादही त्यांनी खोडून काढला. डॉ. तांबे यांनी पुरुषसूक्ताचे शास्त्रीय विश्‍लेषण "द अनटोल्ड सिक्रेट्‌स ऑफ लाइफ' या ग्रंथात केले आहे. त्यातील संशोधनात्मक संदर्भ देत त्यांनी स्पष्ट केले, की वेद काळात जातिव्यवस्था नव्हती. उलट, जन्माने प्रत्येक मूल शूद्रच असते, असे गीतेत सांगितले आहे. त्यावर संस्कार केल्यावर मनुष्यत्वाचा दुसरा जन्म होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता आल्यावर तो विप्र होतो. परमपुरुषाचे वर्णन करताना रूपके वापरली आहेत.
"शूद्र शब्दाचा संस्कृतमधील अर्थ व्यापणे असा होतो. "द्र' म्हणजे धावणे. पाय हे धावून व्यापण्याचे काम करतात आणि मिळविण्याचे काम करतात. म्हणून पुरुषसूक्तात पायांना शूद्र ही उपमा दिली आहे. वैश्‍य शब्दाचा अर्थ धारण करणे किंवा साठवणे. म्हणून पोटाचा भाग वैश्‍य मानला गेला आहे. पोटापासून वैश्‍य जन्मले असा त्याचा अर्थ नव्हे. तसेच क्षत आणि त्रयातेपासून क्षत्रिय शब्द बनला आहे. क्षतीपासून संरक्षण (त्रयात) करणे म्हणजे क्षत्रिय, संरक्षण कोण करते तर बाहू, म्हणून त्यांना क्षत्रिय म्हटले गेले आहे. ब्रह्म म्हणजे ब्रह्मांड. ते "सुप्रीम' तत्त्व आहे. येथे मेंदू "सुप्रीम' आहे म्हणून त्याला ब्रह्म ही उपमा आहे. संस्कृतमध्ये ब्राह्मण हा शब्द व्यक्तीला उद्देशून नाही, त्यासाठी विप्र आहे,'' असे विवेचन डॉ. श्री बालाजी तांबे यांनी केले.

Purusasuktababata idiopathic mistake: Sri Balaji Tambe


"MAHA it could not support any lingavacaka there and it caturvanya system. Purusasuktaca means have been created misunderstanding well not janalyamule about groundless. Purusasuktatila hymns are progremasarakhe this computer. Body all urjakendranna stimulate the muscle or is mantroccaram of spandanata, '' or words to worship at said the senior spiritual guru Dr. purusasuktace support. Mr. Balaji said copper.

Vitthal of Pandharpur in time should not be called MAHA worship; Otherwise, the movement to do, that example is given some organizations. Against this background, "Sam Marathi channel Dr. said in an interview. Tambe purusasuktaca means shown destiny. And they said," "tradition say God's worship at MAHA is very old and in all places, and that even. Smarthas or Vaishnavism or Shaivism Social sect tradition that really matter! message not taken any objection to this day saint. it Dnyaneshwar mauli, Tukaram Maharaj etc.. ''

"No lingavacaka term male purusasuktatila the srstinirmitici concept. The male-female these words. Flood the city. Here visvalaca flood is said and Ish men. Therefore, it is not currently being expressed purusasuktatuna The male rate used. Vedanta to abhipretaca no. we have decided to do-then, '' said Dr. copper said.

"Rsimuninni mantras planning is very thoughtful. The computer" are progremapramane. It is produced by the vibrations of the body profitable. The world is going spandanavaraca, of not? Spandanaca out mutakhadesuddha are using. Is the strength of the voice in. Using cetasanstheca full breath and ten nadyansaha sufficient vibrations posed mantrammule uccaralelya. So learn the meaning of self before question purusasuktala, understand the use of its samajahita for that, '' suggested by, "" destroyed thousands of years who have this mantra badalayaceca, he must be put in front of the option can equally and together, sitting should decide paryayambabata discussion, '', advised Dr. Copper he said.

Purusasuktata jativyavasthece support that argument, they removed overridden. Dr. Copper by purusasuktace classical analysis "The Untold Secrets has been of Life" book. Made it clear he does not refer to the research, the Vedas had Communities in. On the contrary, the birth of each child sudraca, it is said Gita. Birth another personification On impression and the ability to take decisions when it was vipra. paramapurusace are used when describing the metaphor.

"Sudra Sanskrit word that means to occupy it." Dra "is running. Leg work to earn it and work vyapanyace rescue. This analogy is given as purusasuktata feet Sudra. Vysya meaning to hold or accumulate. Has been considered as the ventral part of the Vaishya. Not mean that his stomach was born from the Vaishya. And injuries from the Kshatriya and trayate word has become. Protection factor (trayata) to the warrior, who protect the arm if, as has been said to them Kshatriya. Brahman is the universe. That "Supreme" principle. The brain "Supreme Brahman as he is likened to. Sanskrit word Brahman is not addressed to a person, that is vipra, '' said Dr. explanation. Shri Balaji Tambe made.

No comments:

Post a Comment