Wednesday, December 24, 2014

India-Pakistan-China-USA


सुंभ जळेल, पीळ आहेच..

पेशावरच्या शाळेवरील हल्ल्यातून हे दिसून आले की, पाकिस्तान हा दहशतवादी कारवायांचे खरोखरच लक्ष्य ठरू शकतो. या घटनेनंतर पाकिस्तानने बदलाची काही चिन्हे दाखविली असली, तरी भारताशी शस्त्रस्पर्धा आणि शत्रुत्व यांचा पीळ कायम राहील. अण्वस्त्रसज्ज पाकिस्तानवर दहशतवाद्यांचा प्रभाव वाढू नये, एवढे पाहणेच जगाच्या हाती आहे..  
'नियतीचा न्याय' किती निष्ठुर, पण चोख असू शकतो याचा एक अनुभव नुकताच पाकिस्तानातील पेशावर येथे आर्मी पब्लिक स्कूलमधील अनेक विद्यार्थ्यांच्या झालेल्या क्रूर हत्येमुळे जगापुढे आला. तेहरीक-ए-तालिबान, पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने या क्रूर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. उग्रवादाच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात घृणास्पद अशा या घटनेने जगाला सुन्न केले आणि दीडशे निष्पाप विद्यार्थ्यांच्या मातापित्यांना दु:खाच्या खाईत लोटले.
या घटनेचे यथार्थ आकलन होण्यास गेल्या ३० वर्षांत उफाळलेल्या अतिरेकीवादाची पाश्र्वभूमी समजणे गरजेचे आहे. तालिबान आणि तत्सम इतर अतिरेकी गटांचे मूळ १९७० च्या दशकात सोव्हिएत रशियाचा अफगाणिस्तानातील हस्तक्षेप मोडून काढण्यासाठी अमेरिकेने सुरू केलेल्या मोहिमांमध्ये सापडेल. मोहिमेत पाकिस्तानचे व्यूहात्मक सहकार्य महत्त्वाचे होते आणि ते देताना पाकिस्तानने मोबदलाही चोख घेतला. अमेरिकेकडून धन व सामरिक शस्त्रास्त्रांचा मिळालेला मुबलक पुरवठा पाकिस्तानने भारताविरुद्ध पुरेपूर वापरला, त्यातून पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमावर्ती भागात 'तालिबान' दहशतवाद्यांना आश्रय मिळाला व प्रशिक्षण केंद्रे स्थापन करता आली, हे जगजाहीर आहे.
कालांतराने सोव्हिएत रशिया अफगाणिस्तानातून बाहेर पडल्याने रिकामटेकडय़ा झालेल्या तालिबानच्या अफगाण अतिरेक्यांना पाकिस्तानने भारताकडे वळवले आणि सुरू झाला काश्मीरमधील दहशतवादाचा नवा अध्याय. अमेरिकेला या दुस्साहसाचे फळ ९/११ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याने सव्याज मिळाले, पण पाकिस्तानने मात्र अतिरेक्यांचा मोर्चा भारताकडे वळवून अनेक हल्ले केले ज्यात शेकडो निष्पाप जीव गेले. इकडे इस्लाम प्रसाराच्या विकृत व अमानुष भ्रमाने पछाडलेल्या अतिरेकी गटांच्या नवनवीन आवृत्त्या निघत गेल्या, त्यांनी अतिरेकी कारवायांचे लोण इतर देशांत पसरवले. या प्रसाराचा फटका पाकिस्तानलाही वारंवार मिळालाच; पण यातून बोध घेणे राहिले दूर, उलट 'आम्हीदेखील दहशतवादाचे बळी आहोत' हा साळसूद कांगावा करून जगाची सहानुभूती मिळवण्यास पाकिस्तानचे फावले.
बांगलादेश युद्धातील पराभवाची सूडभावना आणि काश्मीरचा हव्यास या दोन हेतूंनी पछाडलेल्या पाकिस्तानने भारतात दहशतवादाचे जणू थैमानच घातले. आपल्या कारवायांना झाकण्यासाठी उग्रवादाला 'भला' आणि 'बुरा' अशा दोन व्याख्या दिल्या. स्वत:च्या देशाविरोधी कारवाया वाईट, तर काश्मीरमधील दहशती कृत्ये मात्र 'स्वातंत्र्यलढा' असा लबाड व सोयीस्कर फरक प्रचलित केला.
पेशावर हत्याकांडाने भानावर येऊन मात्र पाकिस्तानने चांगल्या/वाईट दहशतवादांतील कपोलकल्पित भेद झुगारला व देशाला या रोगापासून मुक्त करण्याचा निर्धार जाहीर केला. पंतप्रधान नवाज शरीफ यांनी कठोर पावले उचलण्याचे निर्देश देत मृत्युदंडावरील बंदी उठवली, सैन्याने उत्तर वजीरिस्तानात दमदार कारवाई सुरू केली.. या साऱ्या घडामोडींमुळे जगातील भोळ्याभाबडय़ा मंडळींना वाटले असेल की, पाकिस्तान सुधारत आहे. पण कसचे काय. खरा चेहरा दुसऱ्याच दिवशी जगासमोर आला. २६/११च्या मुंबई हल्ल्याचा म्होरक्या जकी-उर-रेहमान लखवीला कोर्टाने जामिनावर सोडले. लाज झाकण्यासाठी म्हणून की काय पाकिस्तानने त्याला लगेच इतर काही गुन्हय़ांसंदर्भात पुन्हा गजाआड केले; परंतु हाफिज सईद, दाऊद इब्राहिम आजही मोकाट आहेत हे वेगळेच. सुंभ जळला तरी पीळ जळत नसतो या म्हणीची सत्यता जगाला पटली.
या सगळ्या घटनांनी भुरळ पडण्याइतका भारत खुळा नाही. भारतविरोध हे पाकिस्तानचे जन्मजात दुखणे आहे; परंतु जागतिक पटलावार दहशतवादासंबंधी काही अनिष्ट व वेगळ्याच घटना हल्ली घडत आहेत त्या दुर्लक्षून चालणार नाही. इराक-सीरियाचे इस्लामिक राष्ट्र (इसिस) या कट्टर इस्लामिक संस्थेचा जन्म ही यापैकी मोठी घटना. 'इसिस'ने येथून पुढे आपण स्वत: इस्लामचे खलिफा असल्याचा दावा केला असून त्याने प्रेरित मुस्लिमांस या मोहिमेत सामील होण्याचे आव्हान केले आहे. त्याला जगाच्या निरनिराळ्या भागांतून तरुणाईचा प्रतिसाद मिळत असल्याचे नजरेस आले आहे. बेंगळुरू, कल्याण येथील काही तरुणांना झालेली अटक व सिडनी, ओटावासारख्या शहरांत वा बेल्जियममध्ये नुकतेच झालेले अतिरेकी हल्ले हेच स्पष्ट करतात. या सर्व घटनांमध्ये एक गोष्ट नजरेत आल्याशिवाय राहात नाही. ती म्हणजे त्या संबंधित व्यक्तींचा परस्परांशी काहीही संबंध अथवा संपर्क नाही. इतकेच काय तर या सर्व व्यक्तींच्या मागे कोणतेही स्थानिक पाठबळ अगर गट नाहीत. हे सर्व तरुण इसिसने प्रेरित स्वतंत्रपणे कार्यरत आहेत आणि हाच खरा धोका, खरे नवीन आव्हान आहे.
संघटित कारवाया बातमीदारांमार्फत गुप्तचर संस्थांना कळू शकतात व त्यावर प्रतिबंधक कृती शक्य होते; परंतु विखुरलेल्या, एखाददुसऱ्या बहकलेल्या अतिरेक्याने योजलेल्या व कार्यान्वित केलेल्या गोष्टींची पूर्वसूचना मिळणे अशक्यप्राय आहे. भारतासारख्या विस्तृत देशात तर नक्कीच असे म्हणता येईल. वरील घटनांमध्ये एक गोष्ट आणखी दिसून आली, ती म्हणजे या लोकांनी 'सोशल मीडिया'चा केलेला स्वैर वापर. समाजमाध्यमांवरील वार्तालापांची बारकाईने छाननी केल्यास काही सुगावा लागण्याची अंधूक शक्यता आहे; परंतु या नवमाध्यमांचा अफाट पसारा पाहता हे प्रकरण किती कठीण आहे याची कल्पना यावी. हे भर बाजारात काही व्यक्तींमधील बोलणी कळण्याइतकेच कठीण आहे; परंतु जगातील सुरक्षा संस्थांना या नवीन आव्हानांचा विचार करावाच लागेल. समाजमाध्यमांवर देखरेख इथपासून सुरुवात करण्याखेरीज गत्यंतर नाही. मात्र, या माध्यमांवर बंदी आणणे हेदेखील वेडेपणाचे आहे. तसे केल्यास माहितीचा उपलब्ध स्रोतदेखील नष्ट व्हायचा.
याव्यतिरिक्त आणखी एका भयानक शक्यतेकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. ज्या गतीने व आक्रमकतेने इसिस, तालिबानसारख्या संघटना आपला प्रभाव वाढवत आहेत त्यावरून त्यांचे पुढील लक्ष्य सत्ता काबीज करण्याचे असेल हे अगदी उघड आहे. तसे झाल्यास त्या देशाचा शस्त्रसाठा गेलाच समजा आणि तो देश अण्वस्त्रसज्ज असला तर? आणि नेमके इथेच पुन:पुन्हा पाकिस्तान नजरेसमोर आल्याशिवाय राहात नाही.
युद्धसामर्थ्यांत भारताची बरोबरी साधण्याच्या वेडाने पाकिस्तान इतका झपाटलेला आहे की, त्या प्रयत्नात अमेरिकी मदतीविना त्याची अर्थव्यवस्थाच कोलमडली असती. मात्र या खटाटोपात त्याची अण्वस्त्रसज्जता लक्षणीय झाली आहे. मुस्लीम जगतात अण्वस्त्रांचा ज्ञात साठा असलेले सध्या ते एकच राष्ट्र आहे. अशा परिस्थितीत तालिबान, इसिस व इतर गटांपासून या सामग्रीची सुरक्षा ही फार महत्त्वाची आहे हे निर्वविाद. अशा कट्टर देशांचा अमेरिका व भारतविरोध सर्वश्रुत आहे.
आपण या बाबतीत जागरुक आहोतच, परंतु पाकिस्तानवर प्रभाव असलेल्या अमेरिका व चीन यांनीदेखील या प्रश्नावर सावध व प्रयत्नशील असायला हवे. अर्थात, भारतद्वेष हा पाकिस्तानच्या अस्तित्वाचा पायाच असल्यामुळे त्यांना हे शेपूट सरळ करता येणे कठीणच दिसते.
'इसिस'पुरते बोलायचे तर देशातील मुस्लीम समाजाची ही कसोटीची वेळ आहे असेच म्हणावे लागेल. भारतीय मुस्लीम पालकांना तरुण पिढीकडे जास्त आपुलकीयुक्त लक्ष द्यावे लागेल व सुरक्षा व्यवस्थेच्या संपर्कात राहून साहय़ करावे लागेल. भारतीय मुस्लिमांचे देशप्रेम निर्वविाद असल्याने, ही अपेक्षा आपण नक्कीच करू शकतो.

Peshavar of salevarila attack, it was found that Pakistan can really be the target of terrorist activities. Even after this incident, Pakistan, showed some signs of change, however, would continue to convolution of India sastraspardha and enmity. Anvastrasajja should extend the influence of the militants in Pakistan, is in the hands of the world .. so pahaneca
"Destiny justice" How callous, but it may be apt to experience a number of students who have just arrived main reason hatyemule brutal Army Public High School in Peshawar, Pakistan. Teharika-e-Taliban Pakistan has accepted responsibility for the attack or terrorist organization or cruel. Militancy was asleep in the constitution of this infernal world and the most ever in the history of two innocent students matapityanna sorrow khacya rewarded khaita.
To assess the need to understand the realities of this incident still atirekivadaci uphalalelya the last 30 years. Russia and the Soviet intervention in Afghanistan, the Taliban and other terrorists will find out in the decade of the 1970s, the original groups similar to the US to start breaking. Campaign was important to cooperate with Pakistan and said Pakistan had strategic apt mobadalahi. Amerikekaduna money supply and utilization in India, Pakistan received much strategic arms, which Pakistan-Afghanistan border area 'Taliban' terrorists received shelter and training centers were established, it is perfectly natural.
Over time, the Soviet Russia, India, Pakistan to boost Afghan Taliban terrorists in Afghanistan and exiting the rikamatekadaya start a new chapter in the Kashmir terrorism. US fruit or dussahasace 9/11 attack on the World Trade sentaravarila savyaja, in which hundreds of innocent life, but India, Pakistan, however, tell the front was attacked several turns. Islam spread of distorted and inhuman terrorist groups held here devils out of new versions of the past, and while terrorist activities spread to other countries. The spread hit pakistanalahi often milalaca; But it remained to take away the sense, but 'amhidekhila are victims of terrorism "is increased by Pakistan to get sympathy of the world men brutally.
Bangladesh war defeat sudabhavana Pakistan, India and Kashmir thirst or two to raise the devils put thaimanaca as intimidation. Our activities cover for ugravadala 'good' and 'bad' had two definitions. Own activities desavirodhi bad, but if Kashmir terror acts 'Independence' is a liar, and the difference between the prevailing convenient.
The killings came out of Peshawar, Pakistan on good / bad distinctions jhugarala dahasatavadantila stories and the country declared a determination to free from the disease. Prime Minister Nawaz Sharif ban mrtyudandavarila giving instructions take strict steps, the forces of the North vajiristanata energetic action started .. These activities will be felt all the men bholyabhabadaya the world, Pakistan is improving. But what kasace. Real world face the next day. 26 / 11cya left the court on bail Mumbai attack leader Zaki-ur-Rehman Lakhvi. What a shame he got behind the bar again gunhayansandarbhata Pakistan as cover for some of the other; But Hafiz Saeed, Dawood Ibrahim else there are no conflict today. The sow is not the reality of the world was on fire, punch jalala when convolution.
India is not all padanyaitaka answer is too cool events. Bharatavirodha Pakistan is a congenital ailment; But some of the world patalavara dahasatavadasambandhi undesirable and not favoring different events that are happening now. Syria-Iraq Islamic nation (Isis), or the Islamic radical organization born of the big event. 'Isisane Forth Yourself Islam Khalifa claimed to be motivated by religion, he has been a challenge to join the program. It has been noticed in various parts of the world are getting youth. Bangalore, the welfare of the young men arrested in Sydney, otavasarakhya cities that explain the terror attacks in Belgium, just wow. All of these cases does not matter a thing else. They do not contact each other or have any relationship with the persons concerned. What if all these people back if no local support group only. These are all inspired by the young Isis working independently and real risk that, right is a new challenge.
Organized activities batamidarammarphata can know and intelligence agencies were able to act on the prevention; But scattered ekhadadusarya bahakalelya militant is impossible to meet all the implemented and planned in advance. If large country like India, of course, may be called. The cases were found and one thing that they 'indiscriminate use of the Social midiyaca. If the analysis is likely to closely vartalapanci samajamadhyamanvarila some clues there nebulous; However, it is difficult to imagine how the matter should be navamadhyamanca see this vast volume. It is difficult for some individuals negotiation kalanyaitakeca the market; But the world's security agencies have karavaca think this new challenges. Samajamadhyamam monitoring is needed karanyakherija threshold means. However, this also means that the ban is crazy to carry. If so, the information used to destroy srotadekhila available.
In addition, it is essential to pay attention to one more terrible sakyatekade. The speed and aggressively Isis, talibanasarakhya organizations are scaling up our influence is evident even bring their next target will be to capture power. If so, and if it is meant that the country anvastrasajja arms race? And just here, again and again exposed Pakistan does not matter.
Yuddhasamarthyanta is suspicious so crazy in order to cope with Pakistan, India, that would still like arthavyavasthaca without help from its American effort. However, this is a significant anvastrasajjata its effort. It is currently the only nation with known reserves anvastranca Live Muslims. In such cases, the Taliban, and other groups from Isis nirvaviada this content, security is very important. Countries and the United States is known as a staunch bharatavirodha.
One we are aware of this, but the effect on the United States and Pakistan, and efforts must be cautious on the issue of China GNCTD. Of course, since this bharatadvesa Pakistan's existence payaca seems to be difficult for them to come straight to the tail.
"It is time to say isisapurate speaking, have the same criteria of the Muslim community in the country. Indian Muslim parents should be more attention apulakiyukta young pidhikade and need to stay in touch with sahaya of security arrangements. Since the Indian Muslims stand nirvaviada, you can certainly expect this.

No comments:

Post a Comment