Saturday, December 6, 2014

How to use the Internet on a mobile computer?


संगणकाचे इंटरनेट मोबाइलवर कसे वापरावे



प्रश्न - मला संगणकावरून मोबाइलला इंटरनेट जोडणी करायची आहे, तर ते कसे करता येईल.   - मिथलेश पाटील
उत्तर- सामान्यत: मोबाइलवरून डेस्कटॉपवर इंटरनेट जोडणी अनेकजण करत असतात. मात्र डेस्कटॉपवरून मोबाइलवर इंटरनेट जोडणी करावयाची असेल तर तुमचा अँड्रॉइड मोबाइल हा रूटेड असायला हवा. जर तो रूटेड असेल तर तुम्ही डेस्कटॉपवरील इंटरनेट मोबाइलवर वापरू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्ही मोबाइल संगणकाशी जोडा. यानंतर सेटिंग्जमध्ये जा. तेथे अ‍ॅप्लिकेशन्स हा पर्याय निवडा. त्यानंतर डेव्हलपमेंटचा पर्याय निवडा. यानंतर यूएसबी डबिंग असा एक पर्याय असेल तो सुरू करा. संगणकावर अँड्रॉइड टूल इंटरनेटवरून डाऊनलोड करा. ते डाऊनलोड केल्यावर झिप फाइल एक्सट्रॅक्ट करा. यानंतर तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर अँड्रॉइड टूल.ईएक्सई असा पर्याय येईल. तो रन करा. त्यानंतर सिलेक्ट डिवाइस असा पर्याय येईल. यामधून तुमचे उपकरण निवडा. त्यात डीएनएस निवडा. यानंतर समोर येणाऱ्या 'स्टार्ट' या बटणावर क्लिक करा. यानंतर तुमच्या मोबाइलमध्ये काही अ‍ॅप्स डाऊनलोड होतील. ते डाऊनलोड झाल्यावर तुमच्या मोबाइलवर 'यूएसबी टनल' असा पर्याय दाखवणारा बॉक्स येईल. त्याला परवानगी द्या. यानंतर तुमच्या मोबाइलमध्ये इंटरनेट सुरू होईल. इंटरनेट वापरत असताना कदाचित तुम्हाला 'नो नेटवर्क कनेक्शन' असा संदेश येईल, पण त्याकडे लक्ष देऊ नका. तुमचे इंटरनेट चालू राहील.


प्रश्न- माझ्याकडे डय़ुएल सिमचा मोबाइल असून यामध्ये बीएसएनएल आणि व्होडाफोनचे अशा दोन कंपन्यांचे सिमकार्ड आहे. यातील बीएसएनएलचे इंटरनेट सुरू केल्यावर व्हॉट्सअ‍ॅपमधून संदेश जात नाहीत किंवा येतही नाहीत. पण जेव्हा मी व्होडाफोनचे इंटरनेट सुरू करतो त्या वेळेस संदेश येतात आणि जातातही. असे का होते.     - बलवीरा राऊत
उत्तर- तुम्ही ज्या ठिकाणी राहतात किंवा काम करतात त्या ठिकाणी बीएसएनएलची रेंज कशी येते हे पाहावे लागेल. जर कदाचित तेथे बीएसएनएल डेटाची रेंज कमी येत असेल तर ही अडचण येऊ शकते. जर तुम्हाला ही अडचण कायम येत असेल तर तुम्ही बीएसएनएलच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून तुमच्या कार्डाची तपासणी करून घ्या. जर कार्डात काही अडचणी असतील तर कार्ड बदलून दिले जाईल. त्यानंतर तुमची अडचण दूर होण्यास काही हरकत नाही. 

Q - I want to connect to the Internet mobile computer, but how they can be. - Mithalesa Patil
North- normally mobile on desktop Internet connection are many. This should be your Android mobile Rooted However, if the desktop on mobile Internet connection to be. If Rooted on the desktop, you can use the mobile Internet. Add the first mobile computer for you. And go to settings. Select this option midway there. Then select Development. And it will be an option to enable USB Debugging is. Download Android Internet computer tools. After you download the zip file to extract it. And the option tulaieksai Android on your computer screen. Please run it. Then select the device that will be an option. In turn, select your device. Select the DNS. And before coming to 'start' button on. And some apps will be downloaded to your mobile. Download to your mobile when "USB Tunnel will be a box showing the options. Allow him. And the mobile Internet will continue. Maybe when you're using the Internet 'No network connection' message will be, but do not care. You will continue to the Internet.


 
These are questions I have dayuela Simchi mobile BSNL and Vodafone SIM card two companies. The BSNL message vhotsaaepa not start out on the Internet or yetahi. But when I come to the message that starts at Vodafone Internet and jatatahi. Why were. - Balvir Raut
North- you will see this is where they live or how they work in a range of BSNL. This problem can occur if there is a range of BSNL having less data. If you continue having this problem you can take your card to check BSNL contact the customer service center. If there are any problems with the card will be given to changing the card. Then take out no matter your problem.

No comments:

Post a Comment