Tuesday, December 16, 2014

अजब जोडीची गजब कहाणी

ld copy
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी आपल्या 'खास' नात्याची नुकतीच कबुली दिलीय. त्यानंतर बी-टाऊनमध्ये पुढचा नंबर कुणाचा याची चर्चा सुरू आहे. दीपिका-रणवीर सिंग, कतरिना-रणबीर, श्रद्धा-आदित्य रॉय-कपूर या जोड्या सध्या खूप चर्चेत आहेत. ऑनस्क्रीनच नव्हे तर त्यांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीबद्दल खूप बोललं जातंय. २०१५मध्ये या तीनही हॉट जोड्या पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसतील. सध्या तरी एकमेकांना 'जस्ट फ्रेंड्स' म्हणवून घेणाऱ्या बॉलिवूडच्या या हॉट कपल्सविषयी...

रणवीर सिंग-दीपिका पडुकोण

'गोलीयों की रासलीला रामलीला' या चित्रपटातून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी दीपिका-रणवीरची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर आणली. तिथंच या दोघांचे सूर इतके जुळले की दीपिकाच्या 'फाइंडिंग फॅनी'मध्येही रणवीरनं एक छोटीशी भूमिका स्वतःहून मागून घेतली म्हणे. आम्ही जस्ट फ्रेंड्स ते जगाला कितीही सांगत असले तरी आता समझनेवाले समझ गए है. रणवीर तर उठसूट दीपिकाची तारीफ पे तारीफ करताना दिसतो. या दोघांना एकत्र आणणाऱ्या भन्साळी यांच्याच 'बाजीराव मस्तानी' या मेगाप्रोजेक्टमध्ये पुन्हा ही जोडी एकत्र दिसेल. रणवीरची ही 'मस्तानी' जानेवारी महिन्यात सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचं समजतं.

रणबीर कपूर-कतरिना कैफ

बॉलिवूडचं सगळ्यात हॉटेस्ट कपल अशी रणबीर-कतरिनाची ओळख तयार झालीय. ही जोडी लवकरच त्यांचं नातं उघडपणे कबूल करणार आहेत म्हणे. अलीकडेच या दोघांनी मिळून एक आलिशान घर घेतलं आहे. त्यात ही दोघं एकत्र राहतातही. 'अजब प्रेम की गजब कहानी' आणि 'राजनीती'नंतर पुन्हा एकदा ही जोडी आगामी 'जग्गा जासूस'मध्ये झळकणार आहे. यात कतरिना गुप्तहेरच्या भूमिकेत असलेल्या रणबीरची पर्सनल असिस्टंट दाखवण्यात आलीय म्हणे. नऊ गाण्यांचा तडका असलेला, अनुराग बसू दिग्दर्शित हा चित्रपट ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जातंय.

आदित्य रॉय कपूर-श्रद्धा कपूर

'आशिकी २' या म्युझिकल ब्लॉकबस्टरनं श्रद्धा आणि आदित्यचं आयुष्यच बदलून टाकलं असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आम्ही दोघं एकमेकांसाठी खूप स्पेशल असल्याचं ते वारंवार सांगत आलेत. ही जोडी पार्टीत, एकमेकांच्या घरी, हॉलिडेला चिल आऊट करताना कायम एकत्र दिसत असते. तरीही आम्ही अजूनही सिंगलच आहोत असा दावाही करत असतात. त्यांची ही ऑन आणि ऑफ केमिस्ट्री पुन्हा एकदा मिलन लुथ्रिया दिग्दर्शित 'मिलन टॉकिज' या आगामी सिनेमात दिसणार आहे. आता ही दोघं नात्याची कबुली कशी देतात हे बघण्यासारखं असेल.

No comments:

Post a Comment