Sunday, November 23, 2014

On What's app more than 1 adminव्हॉट्सअॅपवर आता एकापेक्षा अधिक अॅडमिन

व्हॉट्सअॅपच्या ग्रुपवर पूर्वी एकच अॅडमिन असल्याने तो नेटवर्कमध्ये नसल्यास किंवा नंतर त्याने व्हॉट्सअॅपचा वापर बंद केल्यावर ग्रुपमध्ये नवीन सदस्य अॅड करणे, एखाद्या सदस्याला काढून टाकणे यासारख्या गोष्टी करणे शक्य नव्हते. पण आता व्हॉट्सअॅपच्या नव्या अपडेटमध्ये एकाच ग्रुपसाठी एकापेक्षा अधिक अॅडमिन ठेवणे शक्य होणार आहे.

सध्याच्या अॅडमिनने ग्रुपमधील कुठल्याही सदस्याच्या नावावर प्रेस करून होल्ड केल्यास येणाऱ्या मेन्यूमध्ये add to group admins असा पर्याय मिळणार आहे. त्यावर क्लिक केल्यावर संबंधित व्यक्ती अॅडमिन होईल. त्याचवेळी मूळ अॅडमिनही ग्रुपचा अॅडमिन राहील. याशिवाय ग्रुपमध्ये टाइप करण्यासाठी जर एखादी युजर मेसेज टाइप करत असेल तर ग्रुपच्या इतर सदस्यांना तो सदस्य ग्रुपसाठी काहीतरी टाइप करत असल्याचे दिसू शकणार आहे. पूर्वी ही सुविधा फक्त स्वतंत्र युजरसाठी उपलब्ध होती. 

No comments:

Post a Comment