Friday, September 12, 2014

Information of Pitru Paksh in Marathi - Mahalay Shraddha

म्हाळवस.. ( पितृपक्ष ) Mhalvas-Pitrupaksh-Mahalay-Shraaddha
अन्नदान करण्याची परंपरा गेल्या अनेक शतकांपासून कोकणात सुरू आहे. तशी ती अन्य भागांतही आहे. परंतुकोकणातील परंपरेला येथील वैशिष्टयाची एक झालर आहे.अतिथी देवो भव’ यासाठी प्रसिद्ध असलेल्या कोकणात महालय पर्वात जेवणकारीठेवण्याची खासियत आहे. (जेवणकारी म्हणजे पूर्वजांच्या नावाने ज्यांचा आपण आदरसत्कार करणार आहोत अशी व्यक्ती). या पर्वातील पंधरा दिवस म्हाळवस’ किंवापितृपक्ष’ म्हणूनही ओळखले जातात.
आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक प्राणिमात्राचा विचार केला गेला आहे. ज्याच्यात प्राण आहे अशा निसर्गापासून ते माणसापर्यंत अगदी पशुपक्ष्यांपर्यंत प्रत्येकाचा विचार केलेला आहे. इतकंच काय इहलोकी गेलेल्यामृत्यू पावलेल्या पूर्वजांचाही विचार आपल्या धर्मात केला गेला आहे. त्यासाठीच वर्षाचा एक पंधरवडा राखून ठेवला आहे. ज्याला कोकणात पितृपक्षम्हाळवस असं संबोधलं जातं. या काळात पूर्वजांच्या रूपाने एखाद्या नातेवाइकाला जेवण्यास बोलावण्यात येतं. निवडण्यात येणारी व्यक्ती गावातील अथवा आपल्या लगतच्या गावातील असते. ज्या घरात अशा व्यक्तींना बोलावलं जातंतेथे दिला जाणारा मानसन्मान हा पूर्वजांच्या दिमाखाप्रमाणे असतो. त्यांचे पाय धुण्यापासून ते भोजनासाठी पाटावर बसेपर्यंत आणि भोजनानंतर त्यांचा सन्मान करेपर्यंत खास व्यवस्था करण्यात येते. एकदा का त्या व्यक्तींना सन्मान दिला गेला कीत्यांना मातृ-पितृतुल्य मानले जाते. पंचपक्वान्नमिष्ठान्न जेवण येणा-यांना वाढले जाते. अतिशय प्रेमाने त्यांची उठबस केली जाते.
अलीकडे म्हाळवसाची परंपरा नव्या जमान्याप्रमाणे विस्तारत आहे. पूर्वजांच्या नावाने भोजनावळी न मांडता समाजोपयोगी असे काही करता येणं शक्य आहे का याचा विचार लोक करताना पाहायला मिळतात. भाद्रपदाची पौर्णिमा झाली कीम्हाळवसाचे वारे वाहू लागतात. सर्वपित्री अमवास्येला ही अन्नदानाची परंपरा थांबते. भारतीय संस्कृतीचं एक मोठं वैशिष्टय़ आहे कीजिवंतपणी विविध संस्कारांद्वारेधर्मपालनाद्वारे मानवाला समृद्ध बनविलं जातं आणि मृत्यूनंतरही त्याचं स्मरण केलं जातं. ही स्मरणाची परंपरा पिढयानपिढया जपली जाते.
भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष हा श्राद्ध पक्षाच्या रूपाने साजरा केला जातो. श्राद्धाचा महिमा व विधीचे वर्णन विष्णूवायूवराहमत्स्य आदी पुराणांमध्ये तसेच महाभारत,मनुस्मृती शास्रमध्ये विविध ठिकाणी पाहायला मिळते. मृतात्मे याच दिवसात पुन्हा पृथ्वीवर अवतरतात असा समज आहे. वैज्ञानिक जगतात याबाबत ब-याच वेळा काथ्याकुट होतो. मात्रपूर्वजांच्या स्मृती जपण्याचा कसोशीने प्रयत्न करताना पूर्वजांची आदरयुक्त भीती असावीअसा प्रयत्न ही परंपरा निर्माण करताना झाली असावी.
देहावसान झाल्यानंतर धर्मसंस्कृतीत कल्याणाची भावना करणे हे अपूर्व शुभकार्य समजले जाते. त्यातूनच म्हाळवसाची प्रथा रूढ झालीअसे ज्येष्ठ लोक सांगतात. प्रेतात्मे या म्हाळवसात मृत्यूलोकात उतरतात काहा वादाचा विषय असला तरीया मागची परंपरा आणि प्रथेमागचे विज्ञान समजून घेणे अगत्याचं आहे. अनेकवेळा नास्तिकतेचे समर्थन करणारे याकडे लक्ष वेधताना सांगतात कीयेथे दान केलेले अन्न पितरांपर्यंत कसे पोहोचू शकतेयावर भारताचे चलन रुपया’, अमेरिकेत डॉलर’, लंडनमध्ये पौंड’, जपानमध्येयेन’, दुबईत दिनार’ अशी चलने आहेत. जर येथे पोहोचायचे झाल्यास चलनातून व्यवहार करावा लागतो. अशा वेळी रुपयाचे चलन बदलून दिले जाते. त्याप्रमाणे ईश्वराकडे आपले पुण्य पोहोचण्यासाठी श्राद्धात अर्पण केलेल्या वस्तूपूर्वजांच्या स्मरणातून केलेल्या अन्नदानाचे भाग्य मिळतेअसे याचे समर्थन करणारे सांगतात.
श्राद्धाचा विधी करताना पितरांसाठी विषम अर्थात १,,,७ तर देवतांसाठी सम अर्थात २,,,८ अशा संख्येत विशिष्ट माणसांना म्हणजे जेवणकारी’ मंडळींना बोलावून त्यांना भोजन घालण्याची परंपरा आहे. श्राद्धाच्या शेवटी दान देताना हातात जव आणि कुश (दर्भ) याबरोबर पाणी घेऊन अध्र्य दिले जाते. यावेळी पिंडदानही केलं जातं. काहीही असो,श्राद्धाचा विशेष फायदा असा कीमृत्यूनंतरही जिवाचे अस्तित्व राहते. पूर्वजांची आठवण राहते. संपत्तीचे सामाजिकरण होते. गोरगरिबांनानातेवाईकांना मिष्ठान्न भोजन देण्याचं समाधान मिळतं. अन्य भोजन समारंभात रजो-तमो गुण असतात. परंतुश्राद्धाच्या हेतूने दिलं गेलेलं भोजन धार्मिक भावना वाढवतं. परलोकासंबंधी भक्तीभाव विकसित करतं. दानधर्म करायला हवायासाठी आग्रहाने संस्कृतीच आपल्याला वळवते.
औरंगजेबाने आपले वडील शाहजहानला कैद केले होते. तेव्हा शाहजहानने एका खलित्यात औरंगजेबाला लिहितानाअसं म्हटलं आहे की, ‘‘धन्य आहेत ते हिंदू जे आपल्या मृत आई-वडिलांनाही खीर आणि हलवा- पुरीने तृप्त करतात आणि तू आपल्या जिवंत बापाला पाण्याचं मडकंसुद्धा देऊ शकत नाहीतुझ्यापेक्षा ते हिंदू चांगलेजे मृत्युपूर्वी आणि मृत्युनंतरही स्मरण साखळी तोडत नाहीत.’’
महालय’ म्हणजे मोठे श्राद्ध. महालयाचा अपभ्रंश होऊन म्हाळ (मालवणी मुलखातला शब्द ) म्हणण्याचा सोयीस्कर शब्द तयार झाला. कोकणात म्हाळाचे दिवस म्हणजे म्हाळवस असा शब्दप्रयोग झाला. पहिले महाश्राद्ध श्रीरामाने वनवासातून परतल्यावर दशरथ राजाला मुक्ती मिळविण्यासाठी घातल्याचे सांगण्यात येते. या म्हाळवसातील नवमीचा दिवस या तिथीला विशेष महत्त्व असतं. ज्यांच्या घरातून सुवासिनी मृत झाल्या आहेतअशा महिलांची विशेष तिथी या दिवशी केली जाते. या दिवशी सुवासिनींना मोठा मानसन्मान दिला जातो. खणानारळाने ओटी भरली जाते. अमवास्येला तर त्याहून अधिक महत्त्व आहे. या दिवशी म्हाळांचे मोठया प्रमाणात आयोजन केले जाते. ज्यांना आपल्या पितरांची निर्गमनाची तिथीच माहिती नाही ते सर्वपित्री अमवास्येचा मुहूर्त धरतात.
म्हाळवस म्हणजे वडा-सांबाराचे दिवस. मिष्टान्न देताना वडे-सांबार हा मेनू मोठा असतो. अन्नदानाचा हा कार्यक्रम गावागावात साजरा होतो. पितरांच्या नावाने अनेकजणांना बोलावून भोजन दिलं जातंअन्नदान केलं जातं. जेवणका-यांचा हा कार्यक्रम मोठा असल्याने अनेक घरांमध्ये जेवणकारी राहणारी मंडळी पंधरा दिवस घरामध्ये पोहोचतच नाही. जेवणापूर्वी आखित’ (गंध ) लावण्याची परंपरा आहे. भोजन झाल्यानंतर विडा दिला जातो. हा विडा मानाचा समजला जातो. काही ठिकाणी शिधा आणि भेटवस्तूही दिली जाते. काही ठिकाणी ब्राह्मणांना जेवू घातलं जातं. काही गावांमध्ये दिवाळीनंतर म्हाळ घालण्याची परंपरा आहे.
या दिवसात जेवणका-यांची असणारी चंगळ आणि पूर्वजांच्या स्मृतीची परंपरा यात पंधरा दिवस कसे निघून जातात समजत नाही. काहीजण अनंत चतुर्दशी ते सर्वपित्री अमवास्येपर्यंत घरात जेवतच नाहीत. या दिवसात त्यांचे एक प्रहरी भोजन सुरू असते. जेवणकारी असणा-या व्यक्तींना उपवास धरणे अगत्याचं असतं. काही ठिकाणी आग्रहाचे निमंत्रण असल्यामुळे आणि एकाच दिवशी दोन-दोन म्हाळ असल्यामुळे एका ठिकाणी जेवणकारी तर दुस-या ठिकाणी ते केवळ आपली उपस्थिती लावतात. तिथे त्यांना पुन्हा काही खाता येत नाही.
काही ठिकाणी या म्हाळवसात कुळी’ वाचण्याची परंपरा आहे. दिवाळीच्या हंगामात ठाकर मंडळी अशी कुळी घरोघरी येऊन वाचतात. हा एक चालता बोलता इतिहास असतो. आपले पूर्वज कोणपूर्वजांचे पूर्वज कोण होते याची वंशावळच गेयतेतून (गाण्यातून)मांडली जाते. या पूर्वजांचे स्मरण म्हाळा दिवशी व्हावे म्हणून सायंकाळच्या वेळी या कुळी वाचणा-या मंडळींना पाचारण करण्यात येते आणि मग कोणत्या पुत्राने कशासाठी दान केले यापासून ते त्यांचे पूर्वज कोण होतेपूर्वजांनी दानधर्म कसा केला होता या सर्वाची वंशावळीच पुढे आणली जाते. ही कुळी सांगण्याची पद्धतीही अनोखी अशी आहे. कोकणचं ते खास वैशिष्टय़ समजलं जातं. नव्या पिढीला पूर्वजांच्या पराक्रमाची जाणीव व्हावी असा या मागचा हेतू असतो.
शहरी भागात म्हाळाने स्वरूप बदललेले आहे. आता म्हाळासाठी जेवण करण्यासाठी घरात आवश्यक असणा-या माणसांची कमी असल्याने हॉटेलमधून ऑर्डर दिल्या जातात. काही ठिकाणी आचा-यांना निमंत्रित केले जाते. या म्हाळांच्या दिवसासाठी आचा-यांचे काही गटच सध्या सर्व सोयी पुरवितात. आचा-यांच्या काही कंपन्या या म्हाळासाठी सक्रिय होतातही मंडळी खास पॅकेजही देतात. काही ठिकाणी तर ही आचारी मंडळी आपल्या पॅकेजमध्ये जेवणका-यांचीही सोय करून देतात. अलीकडे ग्रामीण भागात महिला बचतगटही म्हाळवसात मदतीसाठी पुढे सरसावतात. गावोगावी होणा-या म्हाळात केळीच्या पानावरच्या भोजनाचा स्वादत्याला धार्मिकतेची किनार आणि सर्व मंडळींचे एकत्र येणं ही एक अपूर्व पर्वणी असते. यासाठी मग पितरांची स्मृती जागविणे कोकणवासीयांना अवघड वाटत नाही. दानधर्म करण्याची परंपरा या मालवणी मुलखात मोठी आहे. कोणाच्या ना कोणाच्या स्मरणार्थ घर बांधून देण्यापासून ते मोठी आर्थिक मदत करेपर्यंतआणि समाजोपयोगी कार्यक्रम राबवून स्मृती जपण्याचा प्रयत्न होतो. मात्र,महालय पर्वात दानधर्म करण्यातही मालवणी मुलूख मागे नसतो. त्या मागची भावना तेवढीच तीव्र असते. ज्या पूर्वजांमुळे या भूमीत आपले आगमन झाले. आपले एक अस्तित्त्व निर्माण करू शकलो त्यांची आठवण आपण ठेवायलाच हवी.

No comments:

Post a Comment