Monday, February 6, 2012

सिद्धी Siddhi in Marathi

सिद्धी --प्रस्तावनेची प्रस्तावना -------

हा शब्दच इतका चमत्कारिक आहे कि त्याचा अर्थ चमत्कार असा कोणी सांगितला तरी मला नवल वाटणार नाही. आणि सिद्धी म्हणजे काय ? आम्हाला माहिताहे हे एकच उत्तर मिळेल. म्हणून त्याबद्दल खरच काही लिहायला नको. म्हणून मी सिद्धी ह्या विषय बद्दल फक्त प्रस्तावना लिहिणार आहे. आता हे जरा ऐकायला विचित्र वाटेल. कारण आपण नेहमी कोणतेही पुस्तक उघडले कि त्यावर सुरुवातीला प्रस्तावना असते ती पाहतो आणि बर्याचदा ते उलटून पुस्तक वाचायला लागतो. प्रस्तावना का असते ह्याचा शोध मला श्री ना स इनामदार ह्यांच्याकडून लागला. गिरगावात बॉम्बे बुक डेपो मधून पुस्तक पंढरीतून पुस्तक विकत घ्यायला गेलो होतो. त्यावेळी लेखक स्वतः सही द्यायला तिथे येत असेत मी औराग्झेबाबद्दल त्यांनी लिहिलेले शेहेन्शहा हे पुस्तक खरेदी केले. त्यांना भेटायला केबिनबाहेर लाईनीत उभा राहिलो. सहज पुस्तक चाळले आणि चकित झालो. सात आठशे पानांच्या पुस्तकाला प्रस्तावनाच नव्हती. ---- ना स इनामदार हे माझे आवडते लेखक आहेत. कारण त्यांचे ऐतिहासिक कादंबरी लिखाण कादंबरी असली तरी भावनिक उर्मी नसते. वास्तवाच्या जवळ जाणारे असते. असे माझे मत आहे. कादंबरीचा नायक कोणीही असला तरी त्याच्या सोबत असलेल्या माणसांना दुय्यम लेखलेले नसते. पार्श्व आणि पृष्ठ भाग कमी रंगवून नायक अतिरिक्त नात्व्लेला नसतो.------- मग भेटल्यावर मी त्यांना विचारले कि आपण मंत्रावेग्ला ह्या दुसऱ्या बाजीरावान्व्र लिहिलेल्या पुस्तकाला २७ पाणी मंत्रावेगळा असे नाव देऊन प्रस्तावना लिहिले आहे आणि एव्हढ्या मोठ्या पुस्तकाला शुन्य प्रस्तावना? ते म्हणाले प्रश्न छान आहे. असे आहे दुसऱ्या बाजीरावांच्या बद्दल आपल्याच समाजात अनेक गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी एव्हढी मोठ्ठी प्रस्तावना लिहिणे आवश्यक होते. उलट औरंग्झेबाबद्दल सर्व्सामान्न्यांच्या मनात गैर समज नाहीयेत. तो जसा आहे तसाच आपल्याला माहित आहे. पण त्याच बरोबर हे हि आहे कि तो आणखीन काय आहे ते आपल्याला माहितच नाही, चुकीचे समज नाहीत म्हणून. ते लिहिले कि झाले, आणि ते इतके मोठ्ठे आहे. नेमकी तीच गोश्ट सिद्धी ह्या विषय बद्दल आहे म्हणून तो विषय फक्त प्रस्तावनेने मांडायचा आहे माझ्या मते माहिती असणे छानच पण चुकीच्या कल्पना असण्या पेक्षा माहिती नसलेली बरी म्हणून हि प्रस्तावनेची प्रस्तावना लिहिणे मला भाग होते. आता कळले ना सिद्धी किती सेन्सिटिव्ह आहे ती

No comments:

Post a Comment