Thursday, February 16, 2012

Kavi Bhushan shivkavya

 Kavi Bhushan shivkavya

कवी भूषण ह्यांचे एक शिवकाव्य - कूरम कमल कमधुज है कदम फूल । गौर है गुलाब, राना केतकी विराज है । पांडुरी पँवार जूही सोहत है चन्दावत । सरस बुन्देला सो चमेली साजबाज है । भूषन भनत मुचकुन्द बडगूजर है । बघेले बसंत सब कुसुम समाज है । लेइ रस एतेन को बैठिन सकत अहै । अलि नवरंगजेब चंपा सिवराज है ॥ अर्थ :- (येथे भुषणाने औरंगजेबाच्या मांडलिक राजांना एकेका फुलाची उपमा दिली आहे.) जयपूरचे राजे कछवाह हे कमळाप्रमाणे , जोधपुरचे राजे कबंधज हे कदंबाप्रमाणे, गौड़ गुलाबाप्रमाणे तर उदयपूरचे राणे केतकी पुष्पाप्रमाणे आहेत. पवार पांढरीच्या फूलासारखे तर चंदावताचे राजे जुईच्या फूलाप्रमाणे, बुंदेले चमेलीसारखे, बडगुजर मुचकुंद फुलाप्रमाणे तर बघेले वसंतकाली फुलणार्या सर्व पुष्प समुहाप्रमाणे आहेत. औरंगजेब हा भूंगा आहे. भूंगा जसा फूलाफूलातून मध गोळा करतो तसा औरंगजेब या सगळया राजांकडून कर गोळा करतो. पण शिवराय चंपकपुष्पाप्रमाणे आहेत की ज्याच्या वाटेला भुंगा(औरंगजेब) कधीही जात नाही.

No comments:

Post a Comment